लोहगडावरील तलावात बुडून खडकीच्या तरुणाचा मृत्यू

0

लोणावळा : लोहगडावरील शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या अष्टकोनी तलावात बुडून एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. जुबेर अकबर शेख (वय.20) रा.खडकी बाजार पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुबेर शेख आपल्या कुटुंबियांसोबत सकाळी लोहगडावरील दर्ग्यावर दर्शनासाठी आला होता. गडावरील शंकराच्या मंदिराशेजारी असलेला अष्टकोनी तलाव पाहणायसाठी गेले असता जुबेर याचा तोल जाऊन तो पाण्यात पडून बुडाला. जुबेर हा तलावात पोहण्यासाठी उतरला असावा असेही बोलले जात आहे. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यु टिमने संध्याकाळी 5 वाजता मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला.