पुणे । लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नव्याने करण्यात येणार्या इन्फ्रास्टक्चरला पुणेरी लूक देणार असल्याची घोषणा खासदार अनिल शिरोळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना पुण्यात आल्याची अनुभूती व्हावी यासाठी शनिवारवाड्यासारख्या पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती उभारण्याचा मानस असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. गेल्या 4 वर्षात लोहगाव विमानतळ परिसरात केलेली विकास कामे आणि प्रवासी सुविधा याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला लोहगाव विमानतळाचे निर्देशक अजय कुमार देखील उपस्थित होते. त्यांनी नव्याने विकसीत केलेल्या प्रवासी सुविधांबाबत माहिती दिली.
दररोज उड्डाण होणार्या विमानांच्या संख्येत 86 उड्डाणांची वाढ करण्यात अली असून त्यामुळे 2014-15 या वर्षात पुणे शहरातून विमान प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही 41 लाख प्रति वर्ष इतकी होती. ती 2016-17 या वर्षत तब्बल दुप्पटीने वाढून 81 लाख प्रतिवर्ष इतकी झाली आहे. तसेच 42 स्के. मी. क्षेत्रफळाचे असणार्या नवीन टर्मिनलला मंजुरी मिळाली असून 2018 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.