‘बालाजी महाराज की जय’च्या जयघोषाने गावातून काढली रथाची मिरवणूक
बहीसा नेवे(वाणी) यांचे वंशज यांच्याहस्ते केली विधिवत पुजा
वरखेडी – येथुन जवळच असलेल्या लोहारी या गावी श्री बालाजी रथोत्सव उत्साहात पार पडला. या रथोत्सवला २२५ वर्षेची परमपंरा असुन यावर्षी ही मोठ्या उत्सहात रात्री ८:२५ वाजता रथोत्सव प्रारंभ झाला तर रात्री उशीरापर्यत मिरवणुक सुरू होती. श्रीमंत बालाजी महाराजांच्या रथाची दुपारपासून सजावट करून बहीसा नेवे(वाणी) यांचे वंशज व संस्थाचे मालक सुभाष नेवे, सुरेश नेवे, रमेश नेवे, यांच्यासह स्वप्नील, सुमीत, सुहास, राजकुमार नेवे यांच्याहस्ते सहपत्नी विधीवत रथाची पुजा करण्यात आली. पौरोहीत्य अविनाश जोशी यांनी केले या श्रीबालाजी मंदीराची देखबाल व व्यवस्था सुकदेव नामदेव घुले पुजारी बाबा रोज करतात.
चौकाचौकात काढल्या रांगोळ्या
मोगरीचे मानकरी जगन्नाथ पाटील, भास्कर बडगुजर, हिरामन बडगुजर, आत्माराम बडगुजर, यांच्याकडे असतो. ध्वजारोहन बेदलदार (मिस्तरी), राजु पांडूरंग कुमावत, चोपदार संजय सुकलाल पाटील, प्रल्हाद यादव, जाधव मशाल, शांताराम सोनवणे (न्हावी), शरद सोनवणे गावातून रथा फिरताना आरती मध्ये अकरा रूपये व त्या पैक्षा जास्त पैसे देण्याची यादी तयार केली जाते. त्यांना नारळ केळीचा प्रसाद दिला जातो. रथाला गावातील तरूण मुले ओढतात. रथाच्या पुढे भजनी मंडळ असते गावातील जोशी यांच्या घरासमोरील चौकात थोडी विश्रांती घेतल्यानंतर रथ पुन्हा जागे वरती आणला जातो.
प्रत्येकाला दिला जातो प्रसाद
रथावरून श्री बालाजी भगवान यांची उतविण्यानंतर सुवासिनीच्या हस्ते आरती पुजा केली जाते. त्यांनतर संस्थाच्या वतीने सेवेकरी मानकरी भानदार, चोपदार, पालखी, आरती करणारे, मोगरी लावणारे, सुतार मशालवाले, न्हावी, टेलर, आरती घेणारे यांना श्री बालाजीचा आर्शिवादरूपी नारळचा प्रसाद दिला जातो. गोविद वेंकटरमन गोविंदाच्या जयघोषात रथाची गावातील मुख्य रस्त्याने मिरवणुक काढण्यात आली.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
पुजारी बाबा सुकदेव घुले, अविनाश जोशी, सरपंच प्रविण पाटील, उमेश पाटील, सतिष पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पाटील, शरद संतोष पाटील, आत्माराम बडगुजर, बापु जोशी, युवराज बडगुजर, दशरत बडगुजर, श्रीपत बडगुजर, श्रावण बडगुजर, मिलींद जोशी, पो.पा. विजय जोशी, श्रीमंत बालाजी युवा फाऊंडेशन तरूण मंडळांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सपोनि गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.