सावदा : रावेर तालुक्यातील लोहारा येथील 19 वर्षीय विवाहित तरुणीने 13 एप्रिल 2022 रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती मात्र त्यावेळी कुटुंबियांनी तक्रार न दिल्याने दफनविधी करण्यात आला होता मात्र मयत तरुणीच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सावदा पोलिसांना अर्ज दिल्याने बुधवारी पोलिस व नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
गुजरात राज्यातील रहिवासी असलेल्या नजमा सलमान तडवी (19) या तरुणीचा लोहारा, ता.रावेर येथील सलमान तडवीसोबत 25 जानेवारी 2022 रोजी विवाह झाला मात्र काहीतरी कारणावरून तरुणीने 13 एप्रिल 2022 रोजीघरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी तक्रार नसल्याने मृतदेहावर दफनविधी करण्यात आला मात्र दोन दिवसांपूर्वी मयत तरुणीचे पिता हसन भाईखा तडवी (गुजरात) यांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत चौकशीची मागणी केली व तसे पत्र सावदा पोलिसांना दिल्यानंतर बुधवारी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. प्रसंगी रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असे मयत तरुणीचे नाव आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.