लोहार्‍याचे सुपूत्र महामानवाच्या शिक्षकाच्या भूमिकेत

0

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर चित्रपट ; लवकरच होणार प्रदर्शन

मुक्ताईनगर (प्रवीण भोई)- लोहारा येथील शिक्षकाने मराठी चित्रपटात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरूजींची भूमिका वठवल्याने त्यांच्यावर गाव व परीसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अर्जुन रामचंद्र भोई असे त्या शिक्षकांचे नाव आहे. ते मुंबईतील तक्षशीला महाविद्यालयात गेल्या 20 वर्षापासून ज्ञानदानाचे व समाजसेवेचे कार्य करत आहेत. तेथे छञपती शिवाजी महाराज, छञपती शाहुजी, फुलेजी, आंबेडकरी विचारांचा सातत्याने जयघोष होतो.

महामानवाच्या जीवनावर चित्रपट: आदर्श फिल्म स्टुडिओ, गणेशनगर, जोगेश्वरी मुंबई पश्चिमच्या बॅनरखाली व निर्माता देविदासजी भगत यांच्या नेतृत्वात चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. चित्रपट हा काही महिन्यात पूर्णत्वास जात असून तो डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर आधारीत आहे. चित्रपटाच्या नावाबाबत गोपनीयता ही निर्मात्यांनी ठेवलेली आहे. महामानवाच्या जीवनातील विविध पैलू समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे. डॉ.भीमराव आंबेडकर साहेबांच्या गुरूजींची अर्थात अंबावडे गुरूजींची भूमिका भोई यांनी वठवली आहे.