वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढा राज्यभर तीव्र करू

0

शहादा । तालुक्यातील म्हसावद येथील बाजार चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कौन्सिलच्या वतीने दि.29 रोजी संघर्ष परिषद झाली. या परिषदेत शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, कारागिर, आशा वर्कर, ग्रामरोजगार व वनपट्टेधारकांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. म्हसावद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कॉ.मोहन शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संघर्ष परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. साने गुरूजींचे वाक्य असलेले उठवू सारे रान, पेटवु सारे रान हे गीत कॉ.माणिक सुर्यवंशी व कॉ.धर्मा पवार यांनी उद्घाटनाप्रसंगी सादर केले. परिषद स्थळाला अंबरदादा विचारमंच असे नाव देण्यात आले. परिषदेच्या कॉ.ईश्‍वर पाटील यांनी प्रस्तावना मांडली.

कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती
परिषदेस मधुकर पाडवी, कॉ.सिताराम माळी, कॉ.धर्मा पवार, कॉ.राजु गिरासे, कॉ.दंगल सोनवणे, कॉ.सखाराम पवार, कॉ.द्वारकाबाई गांगुर्डे, कॉ.विजय पाटील, कॉ.सरदार माळी, सत्तर ठाकरे, गौतम अहिरे, सुशिलाबाई पवार, प्रताप सुकळे, कालुसिंग पवार, धुपा महाराज, सुभाष पवार, सतिलाल शेमळे, दिलीप ईशी, संजय बागले, सुभन ठाकरे, रविंद्र पाटील, बेबीबाई न्हावी, संगिता सुर्यवंशी, रामदास मोरे, दिलीप पाडवी, बन्सीलाल सुकळे, आपसिंग वाघ यांच्या शेतकरी-शेतमजूर उपस्थित होते. सुत्रसंचलन कॉ.ईश्‍वर पाटील, कॉ.मुन्ना टेलर यांनी केले. आभार गुलाब माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी बरकत तेली, विजय सुर्यवंशी, जालम ठाकरे, नबीबाई बर्डे, तुंबा पवार, शरद शिंपी, पोसुआलम भिल, तुंबा वळवी, साहस सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, सिर्या नाईक, अँड़राजेंद्र ठाकरे, गुलाब माळी आदींनी परिश्रमघेतले.

विविध ठराव मंजूर
याप्रसंगी भाकपाचे धुळे जिल्हा सेक्रेटरी हिरालाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. वनपट्टेधारकांना सातबारा उतारा द्यावा, अपिलातील दावे मंजूर करावे. मानव केंद्रबिंदु मानुन विकासाची दिशा ठरविली पाहिजे, असे सांगुन त्यांनी समृध्दी मार्गाच्या नावे जमिन हडप करणार्या राज्य शासनावर टिका केली. परिषदेचे अध्यक्ष कॉ.मोहन शेवाळे यांनी आदिवासींचे स्थलांतर थांबले पाहिजे. आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षणाकरीता आश्रम व निवासीशाळा काढण्यात याव्यात. रेशन व रोजगार शेतमजूरांना मिळावेत, असे सांगितले. कॉ.सुर्यवंशी म्हणाले की, शेतकरी-शेतमजूरांची एकजुट महत्वाची आहे. शेतकर्यांसह शेतमजूर, कारागिरांना नवृत्ती वेतन द्यावेत, यासाठी भाकपा 14 वर्षापासून मागणी करीत आहे. त्या मागणीची अंमलबजावणी व्हावी, असे सांगितले. परिषदेत उनपदेव पर्यटन स्थळाचा विकास करावा. आशा सुपरवायझर, ग्रामरोजगार यांना 15 हजार रूपये वेतन द्यावे, वाकीनदीवर योग्य ठिकाणी बंधारे बांधावे, दरा धरण, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे पाणी शेती बांधापर्यंत पोहचावे, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.पानसरे, डॉ.कलबुर्गी यांच्या मारेकर्यांचा शोध घ्यावा, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, विधवा नवृत्ती, संजय निराधार योजनेचा लाभार्थ्यांचे वेतन वाढावे, असे विविध ठराव मंजूर करण्यात आले.