वंश वाढवण्यासाठी कैद्याला जामीन

0

चेन्नई : वृत्तसंस्था मद्रास उच्च न्यायालयाने एका कैद्याला कुटुंब वाढवण्यासाठी दोन आठवड्यांचा जामीन (पॅरोल) मंजूर केला. सिद्दीक अली (40) हा कैदी तिरुनलवेली जिल्ह्यामधील पलयमकोट्टई केंद्रीय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी एक समिती गठीत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. सिद्दीकीच्या 32 वर्षीय पत्नीने केलेल्या याचिकेवर न्यायाधीश एस विमला देवी आणि टी कृष्णवल्ली यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सरकारने उपाय शोधला पाहिजे
खंडपीठाने म्हटले की, सरकारने एक समिती गठीत करून कैद्यांना त्यांच्या साथीदारासोबत राहण्याचा आणि संबंध ठेवण्यासाठी मंजुरी देण्याचा विचार केला पाहिजे. अनेक देशांमध्ये कैद्यांना हा अधिकार आहे. केंद्राने आधीच एक प्रस्ताव मंजूर केला असून संबंध प्रस्थापित करणे विशेषाधिकार नाही, मात्र अधिकार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कैद्यांनाही आपली इच्छा पुर्ण करण्याचा पुर्ण अधिकार आहे. जर कैद्यांची संख्या अधिक असेल तर सरकारला यावर उपाय शोधला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.