वकवाड येथे मोतिबिंदू निवारण व डोळे तपासणी शिबीर

0

शिरपूर । आर.सी.पटेल मेडीकल फाउन्डेशन शिरपुरतर्फे आयोजित व भुपेशभाई पटेल फ्रेंड्स सर्कल आणि विकास योजना आपल्या दारी अभियान शिरपुर यांच्या संयुक्त सहकार्याने आदिवासी भागातील ग्रापं. वकवाड ता.शिरपूर येथे मोफत मोतिबिंदू निवारण व डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला दोंडाईचा येथील रोटरी आय हास्पिटलचे तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व सेवा लाभली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपस्थित रुग्ण बांधवांना उमरदा येथील शिरपुर साखर कारखान्याचे संचालक जयवंत पाडवी यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वकवाड सरपंच निर्मलाबाई ताराचंद भिल, उपसरपंच ओंकार पावरा, पं.स. माजी उपसभापती जगन पावरा, ग्रा.पं. सदस्य सुकलाल महाराज, वि.का.सोसायटी वकवाडचे चेअरमन शाम पावरा, विकास योजना आपल्या दारी अभियानाचे कार्यकर्ते भैरव राजपूत, महेश पाठक, नईम ईनामदार, संदीप शिरसाठ व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक युवकांचे विशेष सहकार्य लाभले.