वकिलांचा व्यवसायही जीएसटीच्या कक्षेत

0

वकिलांकडून दिले जाणारे कायदेविषय सल्ले हे सेवा या संज्ञेखाली येतात. त्यामुळे वकिली व्यवसायही जीएसटीच्या कक्षेत येतो, मात्र त्यानुसार वकिलांकडून करवसुली करतांना अनेक अडचणी येतील, त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

यावर केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाने म्हटले आहे की, जीएसटीमध्ये कायदेविषय सेवांवरील कररचनेवर अद्याप तरी कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. कायदेविषयक सल्ला या संज्ञेचा अर्थ असा होतो की, कायदेविषयी कंपनीकडून प्रत्यक्ष कायदेविषयक सहाय्य अथवा सल्ला दिला जाणे. न्यायालय आणि न्यायाधिरणाच्या अंतर्गत येणारे प्राधिकरण या सर्वांसमोर सल्ला देणे हे सर्व सेवांमध्ये मोडले जाते. त्यामुळे व्यक्तीगत वकील किंवा वकिलांची कंपनी या दोघांनाही सेवा ही संज्ञा लागू पडते.