नंदुरबार। विधी आयोगाने दिलेल्या 266 च्या अहवालातील अॅडव्होकेट कायद्याच्या विरोधात नंदुरबार येथे वकील संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. वकील संघटनेने या विधेयकाच्या प्रती जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी दिलेल्या निवेदनात वकील संघटनेने हे विधेयक असंवैधानिक लोकांविरूध्द तसेच वकीलांविरूध्द असून लोकशाहीला घातक असलेल्या या दुरूस्ती विधेयकाचा वकील संघटना तीव्र निषेध करीत असल्याचे नमुद करण्यात आले.
दुरूस्तीचा विरोध
याबाबत 16 एप्रिल रोजी अखिल भारतीय वकील संघटनेची मुंबई येथे बैठक होवून याबाबत चर्चा करण्यात आली व त्यावेळी करण्यात आलेल्या ठरावात लॉ कमिशनने भारत सरकारला पाठविलेल्या दुरूस्तीच्या विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा, दमण, दिव, नगरहवेली येथे वकील संघटनेने या विधेयकाचा विरोध केला असून याबाबत लवकरच सर्व खासदारांना देखील निवेदन दिली जाणार आहे व खासदारांनी ही बाब संसदेसमोर मांडावी अशी मागणी करण्यात येणार आहे. सर्व वकील संघातर्फे स्वाक्षरी मोहिम देखील राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व वकील संघाचे सदस्य पंतप्रधान व कायदेमंत्री यांना विरोध दर्शविणारे मेल देखील करणार आहेत. ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात येवून आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत माहिती देण्यात येईल.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनावेळी नंदुरबार जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. ए.के. लोढा, अॅड.एस.एम. शर्मा, अॅड.प्रशांत चौधरी, अॅड.के.एफ.दाऊतवाला, अॅड.सलीम व्होरा, अॅड.अनिल अभ्यंकर, अॅड.प.नी. देशपांडे, अॅड.अल्पेश जैन, वकील संघाचे सचिव अॅड.राजेंद्र मोरे, अॅड.सावळे, अॅड.पिंजारी, अॅड.बैरागी, अॅड.पठाण, अॅड.संजय पाटील, अॅड.शेख, अॅड.पाठक, अॅड.बागुल, अॅड.राजपूत, अॅड.गांगुर्डे, अॅड.मसुदा शेख, अॅड.रेखा अहिरे, अॅड.सिमा खत्री, अॅड.दिपाली कलाल, अॅड.पाटील, अॅड.इंद्रजित, अॅड.महाजन, अॅड. अजहर पठाण, अॅड.एम.शाह, अॅड.संदेश पाटील, अॅड.एस.पाडवी, अॅड.रघुवंशी, अॅड.धनराज गवळी, अॅड.व्ही.बी. शाह, अॅड.एस.बी. पवार व इतर सदस्य उपस्थित होते.