वकीलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणे भोवले

0

भुसावळच्या पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी दोषी

भुसावळ– वरणगाव फॅक्टरी भागातील जनता को.ऑप कन्झुमर स्टोअर्सचे चेअरमन नसताना अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने भुसावळच्या पुरवठा विभागातील तत्कालीन पुरवठा निरीक्षक रवींद्र श्रीराम जाधव, पुरवठा तपासणी अधिकारी रामकिसन लालू राठोड, पुरवठा लिपिक व्ही.बी.शिंदे यांनी निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्याचे तसेच तत्कालीन कर्मचारी प्रमिला नारखेडे या अंशतः दोषी ठरल्याचा अभिप्राय उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) यांनी जिल्हाधिकारी (पुरवठा शाखा) यांना नुकताच दिल्याने खळबळ उडाली आहे. दोषी अधिकार्‍यांवर आता काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अ‍ॅड.राजेश उपाध्याय म्हणाले की, या प्रकरणी आपण एक कोटी नुकसान भरपाईचा दावा शासनाकडे मागितला आहे. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही तसेच अहवालाविरुद्ध तक्रार शासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कलमानुसार दोषींवर ठपका
दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 10 नुसार उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) यांनी दोषी धरले आहे. संबंधितावर आता काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.