वकृत्व स्पर्धेतुन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास-प्राचार्य आदिनाथ पाटील

0

वकृत्व स्पर्धेत प्रसाद जगताप प्रथम

जळगाव : अपयशाची भिती हीच अपयशाला जन्म देते. यासाठी अपयशाची भिती न बाळगता निश्चित ध्येयाकडे वाटचाल केली तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन प्राचार्य आदिनाथ वाकले-पाटील यांनी केले.
काळुंखे ट्रस्ट तर्फे जेष्ठ पत्रकार स्व.सितारामभाई काळुंखे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम व.वा.वाचनालयांच्या सभागृहात उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी वेस्टच्या अध्यक्षा संगीता पाटील, डॉ.नरेंद्र ठाकुर, परिक्षक प्रा.राजेद्र देशमुख, योगेश शुक्ल, प्रा.रेखा बिरारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी वाकले-पाटील म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, संयम, सकारात्मक विचार आणि दूरदृष्टी हे गुण अंगी करणे गरजेचे आहे. मोबाईलचे केवळ दोष न पाहता मोबाईल हे ज्ञान – माहिती मिळल्याचे एक चांगले माध्यम आहे. त्याचा उपयोग त्या दृष्टीने करा. प्रत्येक बाबींचा उपयोग चांगल्यासाठी करा. परंतु स्वत:ला कोणत्याही माध्यमातर अवलंबून ठेवू नका. स्वत:ला उत्तेजित करण्याच्या दृष्टीने वाटचाल ठेवा असे आवाहन ही त्यांनी केले. नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत प्रामाणिक पणे मेहनतीला तयारी ठेवा. नक्कीच इतरांपेक्षा तुमचे करीअर चांगले घडेल असा उपदेशही त्यांनी केला.

स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद जगताप (झेड बी पाटील कॉलेज, धुळे) तर द्वितीय क्रमांक वर्षा उपाध्ये (मु.जे.महाविद्यालय,जळगांव) आणि तृतीय क्रमांक सारांश सोनार (डॉ.बाबासाहेब आबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक शशिकांत बाबर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव), सागर शितोळे (झेड बी पाटील कॉलेज, धुळे), गणेश सावळे (एस.एस.मणियार लॉ कॉलेज,जळगांव), अंजली कानडे (कोटेचा महाविद्यालय, भुसावळ), चेतन बागुल (प्रताप महाविद्यालय,अमळनेर) यांनी मिळविले.
प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले. सुत्रसंचालन उदय येशे यांनी तर आभार विजय डोहोळे यांनी मानले. पसायदान चेतना काळुंखे हिने सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संजय बोंडे, हेमचंद्र काळुंखे, यशवंत चौधरी, दुर्गेश चौधरी, योगेश काळुंखे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोज भांडारकर, विजय जाधव, आनंद मालविया, संजय जैन, प्रसाद जोशी, नरेंद्र चौधरी, शंकर विसराणी, गोपाळ चौधरी, ङ्गारूख तांबोळी, रत्नदिप काळुंखे, प्रकाश वाघ, दिपु कुकरेजा, विवेक सुर्यवंशी, सागर पाटील, शरद राजपुत, सचिन चौघुले, संजय कुळकर्णी, प्रदीप वाणी, निलेश कोळी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.