वडगाव मावळमध्ये सेंद्रीय शेतीला प्राधान्य

0
वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरामध्ये शेतीचे प्रमाण मोठे आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत होती. मात्र आता येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीचा पर्यायाला प्राधान्य देत आहेत. येथील तरूण शेतेकर्‍यांना उच्च शिक्षीत ज्येष्ठ शेतकरी दिनेश बलसावर हे मार्गदर्शन करीत आहेत. रासायनिक खताचा वापर टाळून सेंद्रिय खतावर शेती करण्याबद्दल ते आवाहन करतात. सेंद्रिय शेतीतून विक्रमी भात, मुग, गहू व ताग आदि पिकांचे चांगले उत्पन्न घेत आहेत. त्यांचे हे उत्पादन शेतकर्‍यांना अचंबित करत आहे.
बलसावर हे सेवानिवृत्त व्यक्ती आहेत. त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी 1992 साली सहा एकर ओसाड व पडीक शेती विकत घेतली. त्या जमिनीत मातीचा थर केवळ नावालाच असल्याने अगोदर काहीच पिक घेता आले नाही. 1995 सालापासून आजतागायत बलसावर सेंद्रिय पद्धतीने भात, गहू, मुग व ताग आदी पिके घेतात. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ताग पिक घेवून ते ताग पिक जमिनीत कुजावतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. रासायनिक शेतीने भविष्यातील पिढीला धोका असून कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्यासाठी सेंद्रीय शेती काळाची गरज असल्याने ते सांगतात. तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगावरील वनक्षेत्रात लागणारे वनवे हेच वनक्षेत्र ओसाड होत आहे. रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. त्यांच्या घेतलेल्या भात व गहू उत्पादनाला पुणे-मुंबई शहरात अधिख भाव मिळतो. मावळ तालुक्यातील सेंद्रिय शेती चळवळ सुरु करण्यासाठी ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात.