पाचोरा। तालुक्यातील वडगाव मुलाणे येथे हिंदुसुर्य प्रतिष्ठानतर्फे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सर्व उपस्थितांनी भगवे फेटे, भगवे कुर्ते परिधान केले होते. जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घोडे व हत्तीही होते.
महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेतील बालक घोड्यावर स्वार होते. यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, शिवसेना जिल्हा संघटक जळकेकर महाराज, उदय राजपूत, दीपक परदेशी, तांदुळवाडी सोसायटी चेअरमन प्रतापसिंग मौर्य आदी उपस्थित होते.