वडजाईची पाणीटंचाई दूर होणार – आ. कुणाल पाटील

0

धुळे । वडजाई येथे सध्या भीषण पाणी टंचाई भासत असून गावात पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र आज सुरु केलेल्या सिंचन बंधार्‍यांच्या कामांमुळे येणार्‍या काळात पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान तालुक्यात पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा होत असून त्यात जवाहर ट्रस्टही खांद्याला खांदा लावून पाणी फाउंडेशनच्या लढ्यात सामील होणार आहे, त्यामुळे नागरीकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याची आवाहन आ. कुणाल पाटील यांनी केले.

बागायती क्षेत्रात लवकरच होणार वाढ
लघुसिंचन, जलसंधारण विभाग आणि कृषी विभागातर्फे सिंचन बंधार्‍यांच्या कामाचे भूमीपूजन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वडजाई येथील कोल्हापुरी बंधार्‍यांची दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली यावेळी आ.पाटील बोलत होते, ते पुढे म्हणाले कि, शिवाराचे पाणी शिवारात अडविले गेल्या पाहिजे म्हणून जवाहर ट्रस्ट गेल्या सात वर्षापासून तालुक्यात सिंचन चळवळ राबवित आहे. तरीही नागरीकांनी जागृत राहून त्यात सहभागी होवून लोकचळवळ उभी केली पाहिजे. असेही आवाहन आ. कुणाल पाटील यांनी केले. वडजाई शिवारात होत असलेल्या या बंधार्‍यांमुळे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असून बागायती क्षेत्रातही वाढ होणार आहे. आ.कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन दिनकर पाटील, जि.प.सदस्य राजु मालचे, पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर मराठे, सरपंच कविता सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते महादू पाटील, रमेश पाटील, मनोज शिंदे, खुशाल पाटील, मनिषा बाविस्कर, तुकाराम पाटील, गरताड सरपंच अरुण पाटील, निलेश पाटील, राजेंद्र देवरे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.