धुळे । शहरातील वडजाई रोड भागात रविवारी गोडावूनला लागलेल्या आगीबाबत पोलिसात तक्रार देतांना त्यात नाव टाकल्याच्या आणि पुर्ववैमनस्यातून माजी उपमहापौर फारुक शाह आणि समाजवादी पार्टीचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष रफिक शाह यांच्या गटांमध्ये वाद उफाळला. यातून काल सोमवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. या हल्ल्यात समाजवादी पार्टीचे रफीक शाह गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्याने दोन्ही गटातील 19 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास चाळीसगावरोड परिसरातील यंग बॉईज हायस्कुलजवळ छोटा हत्तीवाहने जाळण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
समाजवादी पार्टीचे निवेदन
याच भांडणातून मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील यंग बॉईज स्कुल जवळ समाजवादी पार्टीचे पदाधिकारी रफीक शाह याच्या मालकीच्या वाहनांना अज्ञातांनी आग लावून दिली. यात छोटा हत्तीवाहन जळाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत माजी उपमहापौर फारुक शहांवर कारवाईची मागणी करीत आंदोलन केले. समाजवादी पार्टीचे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष रफिक शाह यांच्यावर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आहे, या घटनेचा निषेध करीत जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अकिल अन्सारी, आमिन पटेल, जमिल मन्सुरी, इनाम सिद्दीकी, गोरख शर्मा, आलमगिर शेख, गुलाम कुरेशी आदींची उपस्थिती होती.
लोखंडी पाईपने अमानुष मारहाणीचा आरोप
शहरातील वडजाईरोडवरील शिवाजीनगर काझी प्लॉटमध्ये राहणारे समाजवादी पार्टीचे पदाधिकारी रफीक शाह गुलाब शाह (39) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्रादीत म्हटले आहे की, वडजाई रोडवरील मुस्लीम कब्रस्तानजवळ त्यांचे स्व:मालकीचे अमान वर्कशॉप नावाचे वेल्डींग दुकान आहे. त्यांचे सन 2009 पासून माजी उपमहापौर फारुक शाह अन्वर शाह यांच्याशी वाद आहेत. फारुक शाह यांनी त्यांच्या साथीदारांकरवी वडजाईरोडवर असलेल्या रफीक शाह यांच्या गोदामाला आग लावून पेटवून दिले. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या नावाने तक्रार नोंदवली. त्याचा राग रेऊन दि.9 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास रफीक शाह हे काही जणांसोबत समाजाच्या सामूहिक विवाहसोहळ्रासाठी वर्गणी गोळा करण्याकरीता ऐंशी फुटी रोडवरील गफूर नगरातील एका भंगार व्यावसायिकाच्या गोदामावर गेले व तेथे चर्चा करीत असतांना अचानक फारुक शाह यांचे साथीदार कलीम शाह अन्वर शाह, परवेज शाह छोटू शाह, शाहबाज शाह फारुक शाह, सलीम शाह अन्वर शाह, आदील शाह कलीम शाह, शोएब शाह (फारुक शाह यांचा भाचा), रहेमान अजगर शेख सर्व रा.धुळे, हे 7 जण हातात लोखंडी पाईप घेऊन गोदामात घुसले. त्यांनी रफीक शाह यांना कॅबिनमधून ओढून बाहेर काढीत त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने दोन्ही हातावर, पारावर, पाठीवर अमानुषपणे जीवेठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. रफीक शाह हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या साथीदारांनी खासगी रुग्णालरात दाखल केले. त्यानुसार, वरील 7 जणांविरुध्द भादंवि कलम 307, 143, 148, 149, 120 (ब), 506 (ब), 188 अन्वरे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानातील साहित्याची नासधूस
फारुक शहा गटाकडून परस्परविरोधी फिर्याद शादाफ फारुक शाह याने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.9 रोजी शहरातील लोकमान्र हॉस्पीटलजवळील धुलिरा ट्राला पार्ट ट्रेडींग सेंटर रा दुकानावर शादाफ शाह हा मामा व पुतण्यासह बसलेले असतांना तेथे 10 जण आले. त्यांनी शादाफ शाह यांच्या दुकानातील साहित्याची नासधूस करुन शादाफ यांच्यासह आवेश शाह भिकन शाह, रिराजशाह आरूब शाह या तिघांना मारहाण करुन जखमी केले. त्यानुसार, 10 जणांविरुध्द भादंवि कलम 307, 452, 325, 143, 147, 149, 188, 323, 504, 506, मुंबई पोलिस कारदा कलम 37 (1)(3) चे उल्लंघन 135 अन्वरे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.