भडगाव । तालुक्यातील वडजी येथील टी.आर.पाटील विद्यालयात हरित सेना अंतर्गत वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रम झाला. सुरुवातीला वृक्षदिंडी पूर्ण गावात वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात, लेझीमच्या तालात मिरविण्यात आली. वारकरी पथक, कळसधारी कानूबाई पथक आणि विविधांगी पोषाख मुलांनी धारण करून नाचगाणे करून लोकांचे लक्ष वेधले. वृक्ष लागवडीच्या घोषणा दिल्या गेल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी विद्यालयात वृक्षारोपण करून हस्तकला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस.जे. सावंत, भिकन पाटील, बरेच पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस.जे. सावंत यांचे सह एस.जे. पाटील, जे.एच.पवार, एम.एस.देसले, डि.एम.पाटील, आर.एच. बोरसे, के.जी.महाजन, एम.ए.भदाणे यांचे सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
विविध प्रकारच्या हस्तकलाचे मार्गदर्शन
विद्यालयात कार्यानूभव या विषया अंतर्गत विविध प्रकारच्या हाताने तयार केलेल्या वस्तुचे हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले. मुलांनी राखी, मातीची भांडी, खेळणे, कागदाच्या वस्तु, पुठ्याची घरे, फुलदाणी, तोरणे विविध कलाकृती खूप सुंदर आणि आकर्षक तयार केल्या. यानंतर विद्यालयात शिक्षक पालक सभा घेण्यात आली . या सभेच्या अध्यक्षस्थानी कैलास माधवराव पाटील होते. पालकांनी चर्चेत भाग घेऊन पालक म्हणून आपले विचार एकनाथ गायकवाड यांनी मांडले. शिक्षकामधून ए .एस. पाटील, एम.एस.सोनवणे, वाय.ए.पाटील, ई.एम.पाटील, बी.वाय.पाटील यांनी शाळेचे विविध उपक्रम, पालकांची उदासिनता, याविषयी विचार मांडले. पालकांनी आपला पाल्य, त्याची शाळा, शिक्षक या विषयी जागरूकता ठेवावी. वेळेवेळी शाळेत येऊन पाल्या विषयी त्याच्या अभ्यासाविषयी चौकशी करावी. कारण हि बाब आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्वाची आहे याविषयी पालकांना समज देण्यात आली.