वडती उपसरपंचपदी हिरकण पाटील बिनविरोध

0

चोपडा । तालुक्यातील वडती-बोरखेडा गृप ग्रामपंचायत आहे. येथील उपसरपंच निवड नुकतीच पार पडली. त्यात उपसरपंचपदासाठी हिरकण गोवर्धन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडती-बोरखेडा गृप ग्रामपंचायतीचे एकूण 9 सदस्य आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 3 मधून (बोरखेडा) हिरकण गोवर्धन पाटील, सिंधुबाई पितांबर पाटील, लह्याबाई दगडू भिल या तिघे महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले होते. या गृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा संजय भिल या निवडून आल्यात. उर्वरित नऊ सदस्यांपैकी उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत हिरकण गोवर्धन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा संजय भिल हे होते तर ग्रामपंचायत सदस्य रऊफ सुभान तडवी, लताबाई साहेबराव नाईक, कमला राजेंद्र कोळी, सिंधुबाई पितांबर पाटील, लह्याबाई दगडू भिल, गंगुबाई सजन भिल, रवींद्र तानकू धनगर, जयश्री सुनील कोळी हे उपस्थित होते. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस बी कोळी, ग्रामसेवक एन.जी. शिरसाठ यांनी कामकाज पाहिले. या निवडीसाठी खुशाल महाजन, एस.एम.पाटील, पुरुषोत्तम पाटील, अरुण पाटील, पितांबर पाटील, फकिरा पाटील, संतोष पाटील, साहेबराव नाइक, राजेंद्र कोळी, नामदेव निनायदे, भगवान भिल, डॉ.भरत धनगर, पांडुरंग धनगर, आधार कोळी, लतीफ तडवी, माजी पो.पा. जहांगीर तडवी, जी.सी.पाटील तसेच उपसरपंच निवडीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील आदींनी अभिनंदन केले.