वडनगरीत डंपरने एकाला चिरडले

0

* संतप्त जमावाने पेटविले डंपर
* वडनगरीत तणावाचे वातावरण
* तहसीलदारांवर हप्तेखोरीचा आरोप

जळगाव । तालुक्यातील वडनगरी येथील गिरणा नदी पत्रात वाळू डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 7590)ने रस्त्याने जाणार्‍या एका गाई-म्हशी चारणार्‍या गुराखीला उडविल्याची घटना आज घडली असून यात अपघातात गुराखी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुंडलिक कौतीक पाटील वडनगरी असे या गुराखीचे नाव आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर जमावांनी जळगाव आणि धरणगाव तहसीलदार यांनी घटनेची माहिती दिली. मात्र प्रशासन घटनास्थळी हजर न झाल्याने जळगाव तहसीलदारांवर हप्तेखोरीचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रशासन वेळेत हजर न झाल्याने वडनगरी गावातील नागरीकांचा संतापाच्या भरात डंपरवर दगडफेक केली. तर डंपरच्या डिझेलची टाकी फोडली असून डंपरला पेटवून दिली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातारण तयार झाले आहे. यावेळी पोलीसांनी धाव घेवून जमावाला शांतता करण्याचा प्रयत्न करीत आहे.