वडली येथे शिबिरात 37 पिशव्या रक्त संकलित

0

जळगाव। येथून जवळच असलेल्या वडली (ता. जळगाव) येथे श्री दत्त मंदिर आवारात राज्य रक्त संक्रमण परिषद, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 37 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. शिबिरासाठी सुनील पाटील, सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.तसेच रक्तदान शिबिरात नागरिकांकडून उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याचे दिसून आले.

शिबिरासाठी यांनी घेतले परिश्रम
शिबिरावेळी वडलीच्या सरपंच सौ. माधुरी नारायण पाटील, उपसरपंच इंदुबाई ठाकूर, विकासो सदस्य सचिन पाटील, रमेश अजाबराव पाटील, माजी सरपंच योगेश पाटलि, रामचंद्र धनजी पाटील, नितीन सुभाष पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. अरुण पाटील, पो.पा. दिलीप प्रकाश पाटील, पाथरीचे माजी सरपंच शिरीष पाटील, संतोष नेटके, पो.पा. एस.पी. लंगरे उपस्थित होते. शिबिरादरम्यान पोऊनि एन.बी. सुर्यवंशी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशिल मगरे, समाधान पाटील तसेच महावितरणचे कनिष्ठ अभियंता कुणाल महाजन वावडदा, मुकेश ठाकरे शिरसोली, मयुर भंगाळे चिंचोली यांनी भेट देवून शिबिरात सहभाग घेतला. रक्तदात्यांना चहा व बिस्किट देण्यात आले. शिबिरासाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अर्जून सुतार, रक्तपेढी तंत्रज्ञान भरत महाले, अनिल पाटील, निलेश पवार, विकास धनगर, प्रभाकर पाटील, दत्तू चौधरी यांनी परिश्रम घेतले.