वडार समाज संघटित नसल्याने या समाजाची प्रगती नाही – विजय चौघुले

0

जळगाव : आपआपसातील मतभेदांमुळे वडार समाज संघटित नसल्याने या समाजाची प्रगती झाली नाही. या काही मतभेद ही नालायक नेत्यांमुळे सुध्दा निर्माण झालेली आहेत़ त्यामुळे आज मुलांच्या व स्वत:च्या भविष्यासाठी मतभेद विसून एकत्र येण्याची गरज आहे़ सोबतच सोलापुरे येथे डिसेंबर महिन्यात आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात सहभागी होऊन शासनाला वडार समाजाची ताकद दाखवून देऊ, असे प्रतिपादन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौघुले यांनी केले़

आरक्षण व राज्यस्तरीय कार्यकर्त्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गुरवारी दुपारी १२ वाजता शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्त्ता मेळावा पार पडला़ यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, युवाध्यक्ष सुनील राखुंडे, जी़आऱपाटील, प्रल्हाद पवार, बाबु शिंदे, रूपेश कुºहाडे, किरण गायकवाड, दिनेश पवार, नंदु कापसे आदी मान्यवर उपस्थित होते़ मेळाव्याचे प्रास्ताविक आऱजी़ पाटील यांनी केले़ तसेच सभागृह वडार समाज बांधवांनी फुल्ल भरलेले होते़

अनेक नेते समाजाच्या साथमुळे मोठी झाली
चौघुले पूढे म्हणाले की, समाजाला एकत्र आणण्यासाठी गावोगाव फिरत आहे़ त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वडार समाजाची आस्था ठेवावी़ पण माझा वडार समाज हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत नाही, ही खंत आहे़ भटक्या विमुक्त्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही वडार समाजाची आहे़ आज अनेक नेतेमंडळी ही वडार समाजाने दिलेल्या साथ मुळे मोठी झालेली आहेत़ म्हणून आपण वडार आहोत हे गर्वाने सांगा, असे ते म्हणाले़