वडील-मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा

0

अमरावती -माणसाची विकृत बुद्धी कशी असू शकते हे या घटनेतून दिसून येत आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवरच सतत ३ वर्षे शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पित्यास अटक करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. वडील-मुलीच्या पवित्र्य नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातच राहणाऱ्या १३ वर्षीय पीडित मुलीच्या आई-वडिलांचे एकमेकांसोबत पटत नव्हते. त्यामुळे काही वर्षांपासून पीडितेचे आई वडील वेगळे राहत होते. पीडित मुलगी ही आईसोबत राहायची, कधीकधी ती वडिलांना भेटायला त्यांच्या घरी जात होती. यावेळी वडिलांनी स्वत:च्या पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. वडिलांचा सततचा त्रास असह्य झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने हेल्पलाईन विभागाकडे तक्रार करून मदत मागितली.