प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे भाविकांशी साधणार हितगुज
मुक्ताईनगर- तालुक्यातील वढोदा येथील मच्छिंद्रनाथ मंदिरात शनिवार, 9 रोजी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळा होत आहे. सकाळी सात वाजता नवनाथ पारायण सोहळ्याला सुरुवात होईल तर दुपारी चार वाजता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व परीसरातील सेवेकरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.