जळगाव – रेल्वेच्या अपघात जखमी झालेल्या व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हा रूग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, अनिल सोपान गवळी (वय-24) रा. बनोटी वाडी ता.सोयगाव यांना दुपारी 12.40 वाजेपुर्वी पाचोरा चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने गंभीर जखमी झाले. चाळीसगाव रेल्वे पोलीसात जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान दुपारी 12.40 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक तपास रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोरसे करीत आहे.