वनजमिनीवरुन लाठ्याकाठ्यांनी एकास जमावाची बेदम मारहाण

0

नंदुरबार। वन जमिनीचा ताबा घेण्यावरून 8 जणांनी एका तरुणावर सामुहिक हल्ला करून लाठ्या काठ्यांनी त्यास बेदम मारहाण केल्याने त्यास उपचारार्थ अक्कलकुवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी नवसिंग खाजल्या राऊत, रा. वालंबा यांनी सांगितले की, टेमल्या राऊत यांच्या नावावर असलेल्या वनजमिनीवरून वसावे आणि राऊत परिवारातील लोकांमधे जबरदस्त भांडण झाले. या भांडणात नवसिंग राऊत, टेमल्या राऊत आदींना डेंगार्याने जबर मारहाण करण्यात आली. काही जणांनी मध्यस्थी करून हा वाद थांबवला. तथापि नंतर पुन्हा येऊन धिरसिंग वसावे, नार्या वसावे, राज्या वसावे, रमेश वसावे, दाज्या वसावे, झिंगा वसावे, आमद्या वसावे सर्व रा. सरी खालपाडा, ता. अक्कलकुवा यांनी नवसिंग राऊत याच्या पोटात लाठ्यांनी तसेच खांद्यावर डेंगार्याने बेदम मारहाण केली. यामुळे नवसिंग हा जबर जखमी झाला. त्याने दिलेल्या या फिर्यादीवरून वरील आठ आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.