कराची । बिलाल इरशाद अहमद या पाकिस्तानच्या खेळाडूने वनडेमध्ये त्रिशतक ठोकले आहे. बिलाल अहमदने 175 चेंडूचा सामना करताना 320 धावांची मॅरेथॉन खेळी केली आहे. बिलालने इंटर क्लब क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये ही खेळी केली आहे. बिलालने आपल्या या खेळीदरम्यान 9 षटकार आणि 42 चौकार लगावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून हा किक्रम कोणी केलेला नाही. 200 धावांचा टप्पा मात्र भारताचा रोहितने शर्मा, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी तसेच क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी गाठला आहे.