रावेर । ग्रीन आर्मीने राबविलेला उपक्रम वनविभागाला वृक्षसेवा करण्यासाठी महत्वाचा असून वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सभासद असणार्या व्यक्तिंना पाठविण्यात येईल. प्रत्येकाला वनविभागाचे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल तसेच वन्य प्राणी, वृक्ष व नैसर्गिक सौंदर्य याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन वनक्षेत्रपाल आर.जी. राणे यांनी केले. तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात ग्रीन आर्मी नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
अभियानाबद्दल केले मार्गदर्शन
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे.बी. अंजणे होते. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दिपक नगरे, सुत्रसंचालन प्रा. वैष्णव यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने होते. वनविभागाच्या ग्रीन आर्मी अभिनवाची माहिती आवर्जून ऐकत होते.
आधार कार्ड अनिवार्य
प्रत्येकाने अभिनवाचा हिस्सा होण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. ग्रीन आर्मीचा सभासद होेण्यासाठी आधार कार्ड सक्तिचे असून ऑनलाईन प्रक्रिया आहे.
सभासद होेण्याचे आवाहन
या अभियानांतर्गत नोंदणी करणार्या प्रत्येक सदस्याला वनविभागाचे प्रमाणपत्र सुध्दा मिळणार असून ही सेवा निःशुल्क आहे. तरी जास्तीत जास्त सभासद होेण्याचे आवाहन यावल वनविभागाचे उपवन संरक्षक कुमार दहिवाले, वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, धिरज वसईकर, सामाजिक वनीकरणतर्फे करण्यात आले आहे.