नवी दिल्ली : एकदिवसीय भारत विरुद्ध विंडीज या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात महेंद्रसिंग धोनी याच्यासह ऋषभ पंत यालाही संधी मिळाली आहे. आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर प्रश्च उपस्थित झाला होता.
म्हणून धोनीऐवजी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात येईल, अशा चर्चा होत्या. पण आज जाहीर करण्यात आलेल्या संघात धोनीला संघात कायम ठेवून ऋषभलाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर, लोकेश राहुल.