वन विभागातर्फे लाभार्थ्यांना गॅस संचांचे वाटप

0

नवापुर। नवापुर तालुक्यातील भामरमाळ येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीतर्फे 61 लाभ्यार्थींना एल. पी. जी. गॅस वनविभागतर्फे सवलतीचा दरात वाटप माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ईश्वर गावीत वनसमितीचे अध्यक्ष भरत गावीत, समिताचे उपाध्यक्ष गुलाब गावीत, जयवंत जाधव, फुलसिंग मावची, वनपाल ए.एन. जाधव, छोटु मावची, कृष्णा वळवी, संतोष गायकवाड, रामदास पावरा आदी उपस्थित होते. या नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समितीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी केला.

भामरमाळ गावात 61 गॅस संचांचे वाटप
नवापुर तालुक्यातील भामरमाळ हे गाव पहिले आहे की 61 लाभ्यार्थीना एल.पी गँस वाटप होत आहे. यामुळे महिलांचे पण आरोग्य चांगले राहाणार आहे. रोज चुलीवर स्वयंपाक करतात त्याची धुळ डोळ्यात गेल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. जंगलाची काळजी घ्या जंगल वाचेल तर आदिवासी माणुस जगेल. आज वृक्षाची संख्या कमी झाल्यामुळे यांचा परीणाम पाऊसावर झाला आहे. शासनाने दिलेल्या वस्तुचा योग्य वापर करा. यानंतर सरपंच ईश्वर गावीत यांनी जंगालाचे स्वरक्षण करण्याची सूचना दिल्या.