वरखेडच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

बोदवड- तालुक्यातील वरखेड खुर्द येथील श्रीकृष्णा अशोक वराडे (वय 31) या तरुणाने स्वत:च्या घरात बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आनंदा प्रतापसिंग पाटील (40) यांनी खबर दिल्यावरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्या आले. तपास संजय भोसले व निखील नारखेडे करीत आहेत.