वरखेडी- वरखेडी- भोकरी -वरखेडी येथील खलील ए मजीद ते बँक ऑफ महाराष्ट्र पर्यंत पाचोरा – जामनेर राज्य मार्ग क्र 19 ला लागून उकिरडयाचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्याच्या दोनही बाजुला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. यामुळे रस्त्यावर अपघात नित्याचे झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अपघात झाले नित्याचेच
या उकिरड्यांमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य मार्गावरती खलील मजीद रेल्वे गेट व महाराष्ट्र बँक पर्यत अनेक लहान मोठे अपघात झालेले आहे. काही ची नोंद आहे तर काही आपसातच मिटले असून काहींना तर ा हात पाय गमावेवे लागले असल्याची माहिती आहे. संध्याकाळी व सकाळी पायही सुध्दा चालणे या रस्त्यावरून कठीण असते. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. उकिरडे राज्य मार्गाववर विखुरलेले असुन रस्त्याच्या दोनही कडेने गाड्या पॉर्किंग करून उभ्या असतात. समोर समोर दोन मोठी वाहने आली असता त्या ठिकाणी मोठा बिकट प्रसंग निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळते. या राज्य मार्ग वरती ग्राम स्वच्छता अभियानाचा फियास्को झाल्याचे चित्र आहे. रेलवे फाटकपुढे रस्त्याच्या दोनही बाजुंना मोठी वाहने पार्किंग केलेली असतात यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणार्यांना समोरचे दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.