वरखेडी येथे हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबिर

0

वरखेडी: पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे 8 एप्रिल बुधवार रोजी हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगेश चौधरी यांनी सांगितली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भविष्यात रक्ताची आवश्यकता पडू शकते. हा विचार लक्षात घेता वरखेडी गावातील तरुण तसेच जेष्ठ नागरिकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. शिबीराला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार असून जि.प. मराठी शाळा वरखेडी येथे होणार आहे. रक्तदान शिबिर रेडक्रॉस सोसायटी मार्फत होणार आहे. रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगेश चौधरी, पुंडलिक पाटिल, दिपक पाटिल यांनी केले आहे.