चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या महिलांच्या कुंटुबियांना 30 रोजी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतिश पाटील यांनी भेट देवून त्यांचे सात्वन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या 3-4 महिन्यांपासून वरखेडे उंबरखेड या परीसरात धुमाकूळ घातला असुन त्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मयत कुंटुंबियांचे सात्वन करण्यासाठी आ. सतिश पाटील यांनी 30 रोजी वरखेडे येथे येवुन मयतांच्या कुंटुंबियांचे सात्वन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मयताच्या कुंटुंबियांना तात्काळ मदत का दिली नाही असे सांगुन वनविभागाच्या आधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच कोंबिंग आपरेशन का करत नाही, असे सांगुन तात्काळ बिबट्याला जेरबंद किंवा ठार न मारल्यास विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचे समवेत तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, दुध संघाचे प्रमोद पाटील, मंगेश पाटील, भगवान पाटील, भैय्यासाहेब पाटील, पिनल पवार, वनविभागाचे आदर्श रेड्डी, संजय मोरे व सरपंच भिवसन जगतात तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.