चाळीसगाव । वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पामुळे चाळीसगाव आणि भडगाव तालुक्याला फायदा होण्यासाठी माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी प्रकल्पास चालना देऊन मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करुन दिली होती. या प्रकल्पामुळे चाळीसगाव तालुक्यातील 6 हजार 285 हेक्टर तर भडगाव तालुक्यातील 1 हजार 256 हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन परिसर ओलीताखाली येणार असल्याचे हित लक्षात घेऊन माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविला होता. त्यात चाळीसगाव तालुक्याला वरदान ठरलेले वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम 3 वर्षापासून बंद आहे, काम जवळपास पुर्णत्वास व्हायला हवे होते, मात्र ते काम आजवर फक्त 5 ते 10 टक्केच झालेले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी करत वरखेडे लोंढे बॅरेज शाखा अभियंता पी.जे. लोकाक्षे यांना निवेदन 24 नोव्हेंबर 2017 रोजी देण्यात आले व सदर प्रकल्प लवकरात लवकर सुरु करुन तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडवण्यात यावा, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार राजीवदादा देशमुख, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, कृउबाचे माजी उपसभापती जालम पाटील, पं.स.सदस्य अजय पाटील, भाऊसाहेब केदार, जिभाऊ पाटील, शिवाजी सोनवणे, बाजीराव दौंड, प्रदीप अहिरराव, नगरसेवक दिपक पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, अनिल जाधव, ईश्वर ठाकरे, विजयसिंग पाटील, छगन पाटील, भैयासाहेब पाटील, जगदीश चौधरी, मिलिंद जाधव, रावण पाटील, गोकुळ कोल्हे, जिजाबराव राठोड, अभिजीत शितोळे, जयाजी भोसले, प्रभाकर पारवे, विजय पवार, भाऊसाहेब पाटील, अमोल चौधरी, निरज अजबे, शुभम पवार, प्रकाश पाटील, यज्ञेश बाविस्कर, संजय राठोड, किरण राठोड, सुभाष राठोड देवचंद राठोड, रावसाहेब सोनवणे, पृथ्वीराज चौधरी, अजय पाटील,निखिल देशमुख, आकाश पोळ, हृदय देशमुख, रोहीत पाटील, पंजाब देशमुख, शेखर पाटील, दत्तू मोरे, दशरथ भोसले, किरण भोसले, अनिल पाटील, रावसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.