वरगणाव नगरपरीषदेतील कर्मचारी समायोजनासाठी जलसंपदामंत्र्यांना ‘साकडे’

0

सकारात्मक निर्णयाची ग्वाही ; नगराध्यक्ष सुनील काळे यांचा पुढाकार

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव नगरपरीषदेच्या सर्व कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालण्यात आले. यावेळी आकृतिबंध करताना प्रशासनाने कसा अन्याय केला ? हे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनंत गढे यांनी पटवून दिले. महाजन यांनी मंगळवारी नगरपक्षहषद प्रशासनाचे संचालक तथा आयुक्त कृष्ण मथुन व प्रधान सचिव मनीषा म्हस्कर यांच्यासोबत बैठक घेवून या विषयावर चर्चा करून न्याय देण्याचा निश्‍चित प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. प्रसंगी नगरसेवक रवींद्र सोनवणे, कामगार नेते मिलिंद मेढे, माजी सरपंच सुखलाल धनगर, प्रकाश भानुदास चौधरी संघटनेचे अध्यक्ष अनंत गढे यांच्यासह कर्मचारी गणेश तळेले, मेघराज चौधरी, शंकर झोपे, मुक्तार खान, अनिल चौधरी, विजय मराठे, वासू भोई, बाबूलाल भोई, राजू जुमळे, जतीन सपकाळे, सुभाष जोहरे, कृष्णा माळी, अशोक चौधरी, योगेश धनगर, योगेश भोई, राहुल तायडे, निलेश झांबरे, अशोक तायडे, सुभाष भोई, नारायण भोई यांच्यासह 80 ते 90 कर्मचारी उपस्थित होते.