वरणगावच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

0

डॉ.राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने दिले निवेदन ; मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका

वरणगाव- केंद्रीय भूपृष्ठ मंत्री तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांची बेटी बचाव, बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेट घेत वरणगाावच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली. प्रसंगी भाजपा पदाधिकारी माजी सभापती राजेंद्रजी गुरचळ, माजी सरपंच सुखलाल धनगर, शामराव धनगर, प्रवीणकुमार ढवळे, किरण धुंदे यांची उपस्थिती होती.

वरणगाव पालिकेला निधी देण्याचे आश्‍वासन
वरणगाव नगरपरीषद ही तीन वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झाली असून शहरात पाहिजे तश्या अपेक्षित निधीअभावी विकास कामे करण्यात अडचणी येत आहे. त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केले. भोगावती नदीच्या खोलीकरणासह वरणगावातून समांतर महामार्गासाठी 70 कोटी मंजूर झाले होते त्यापैकी फक्त 30 कोटीतूनच काँक्रिटीकरणचा रोड केला जात आहे बाकी सूचवलेली फुलगाव फाटा ते साई बाबा मंदिर दरम्यान दुभाजक स्ट्रीट लाईट, वरणगाव चौफुली सुशोभीकरण व दरम्यानच्या शिवाजी नगर, पोलीस स्टेशन, शेतकी संघाच्या, सातमोर्‍या वरचे जीर्ण पूल नवीन बांधण्यात यावे व नागरीकांसाठी पथमार्ग उभारण्यात यावा तसेच सदरची कामे ही 30 कोटीतून होणार नाही त्याकरीता वरणगाव च्या वाटेला आलेला 70 कोटीतूनच पूर्ण कामे करण्यात यावी तसेच दुसरीकडे वळवलेल्या 40 कोटींचा शोध लावून आमच्या वाटेवर आलेले पूर्ण 70 कोटीतूनच दर्जेदार कामे करण्यात यावी व पळवलेले 40 कोटी परत मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. गडकरी यांनी संबंधीत अधिकार्‍यांना सूचना देवून वरणगाव नगरपालिकेने सुचवलेली कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. निधी देण्याबाबत सकारात्मक आश्‍वासन गडकरी यांनी दिले.