वरणगावजवळ भरधाव ट्रक उलटला

0

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील साईबाबा मंदिराजवळील तळवेल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक उलटल्याची घटना 20 रोजी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी ट्रक चालक खबर दिनेश अमृ बसंतो (रा.सफई, ता.सारंगपूर, जि.मोतीयारी) यांनी वरणगाव पोलिसात खबर दिल्यावरून मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. बसंतो हे ट्रक (जी.जे.19-0098) ने जात असताना समोरून दोन ट्रक ओव्हरटेक करीत असताना अपघात टळण्यासाठी ट्रक रस्त्याच्या कडेला नेले असता ट्रक उलटला.