नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे पीकअप शेड प्रवासी निवार्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूजर झाला असून जिल्हा नियोजन समिती सदस्य व वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीला यश आले आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्यांना जो हक्काचा निधी दिला होता तो निधी सदस्यांना त्यांच्या मागणी नुसार कामांना प्रशासकीय मान्यता तात्काळ देण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणी नुसार वरणगाव शहरात महिला, माता-भगिनी विद्यार्थी व प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी चौफुल्लीवर उभे राहावे लागत होते. अनेकवेळा चौफुल्लीवर अपघात होवून अनेकांना प्राणही गमवावे लागले होते. एस.टी.महामंडळाकडे वारंवार मागणी करूनही बसस्थानक झाले नाही म्हणून प्रवासी निवारा पिकअप शेड जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून द्या, अशी जनहिताची मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली होती.
अखेर मिळाली प्रशासकीय मान्यता
पालकमंत्र्यांनी विषय समजून घेत वरणगावकरांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्यामधून 10 लाख रुपयांच्या प्रवासी निवारा पिकप शेड उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यतेची प्रत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नगराध्यक्ष सुनील काळे व उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ यांच्या हातात सुपूर्द केली. दरम्यान, उर्वरीत 10 लाखांच्या निधीतून वरणगाव शहरात नागरीकांना बसण्यासाठी बेंचचा सुद्धा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.