वरणगावातील अक्सानगरातून ट्रॅक्टरच्या बॅटर्‍या लांबवल्या

0

वरणगाव- शहरातील अक्सानगरातील रहिवासी बशीर खान बलदार खान व रशीद खान नजीर खान यांच्या मालकिच्या ट्रॅक्टरमधून 16 हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटर्‍या लांबवण्यात आल्याची घटना 6 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बशीर खान बलदार खान व रशीद खान नजीर खान (अक्सानगर, वरणगाव) यांच्या मालकिच्या ट्रॅक्टर (एम.जी.एल 5851) व (एम.एच 19 ए.एन.3988) हे ट्रॅक्टर सायंकाळी घराजवळ लावले होते. सकाळी कामावर जाताना ट्रॅक्टर सुरू करताना बॅटरी चोरीस गेल्याची घटना लक्षात आीली. अज्ञात चोरट्यांविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.