वरणगावातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले

वरणगाव : साई पार्क जवळ लागून असलेल्या वीटभट्टीवर काम करणार्‍या अल्पवयीन अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार, 23 रोजी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वरणगाव येथे अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडीलांसह वीटभट्टीवर कामास होती. सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेले आहे. मुलीची उंची साडे चार फूट, रंगाने सावळी, चेहरा लांबट, नाक सरळ, अंगात काळे रंगाचे टॉप व फ्लॉझो गुलाबी रंगाची लॅगीज आहे. अज्ञात तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशीष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.