लोकप्रतिनिधींनी घेतली दखल ; दर्जेदार काम करण्याची ठेकेदाराला तंबी
वरणगाव- वरणगावातील भोगावती नदीवरील सातमोरी पुलाला संलग्न असलेला बंधारा दुरूस्ती व खोलीकरणाचे काम जलयुक्त शिवार अभियानातंर्गत होत असलेतरी बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याबाबत सडतोड वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने मंगळवार, 29 मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या ्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जळगावच्या जलसंधारण विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधिकार्यांनी भेटी देऊन मंगळवारी कामाची पाहणी केली.यावेळी होत असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे दिसून आले. यामूळे अधिकार्यांनी कामबंद करून कंत्राटदाराला पुन्हा दर्जेदार काम करण्याची तंबी दिली.
अधिकार्यांची भेट ; निकृष्ट कामाचे वृत्त ठरले खरे
मृद व जलसंधारण विभाग जळगांव यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत वरणगांव जवळील भोगावती नदीवरील जुन्या सातमोरी पुलाला संलग्न असलेल्या बंधार्याची दुरूस्तीचे काम 15 दिवसापासून सुरू होते मात्र कत्रांटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे वृत्त ‘जनशक्ती’ मध्ये मंगळवार, 29 रोजी प्रसिध्द होताच तालुक्याचे आमदार संजय सावकारे व जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी वृत्ताची दखल घेवून मृद जलसंधारण विभागाला चौकशीचे आदेश दिले. प्रसंगी अभियंता आर.टी.पाटील, शाखा अभियंता आर.एस.सुर्यवंशी, स्थानिक नगरसेवक गणेश धनगर व सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी बांधकामाच्या ठिकाणी जावून चौकशी केली. यावेळी बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली रेती मातीमिश्रीत तसेच सिमेंटचा व आसारीचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. यामुळे बांधकाम बंद करून कंत्राटदाराने निकृष्ठ केलेले बांधकाम काढून पुन्हा दर्जेदार करावे, असे आदेश देण्यात आले. उभयंताने दखल न घेतल्यास विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार असल्याची तंबी ठेकेदाराला देण्यात आली.