वरणगावातील पोलीस शिपायाची रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना ; कौटुंबिक कलहातून घटनेचा अंदाज

जळगाव- वरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या जितेंद्र उर्फ जीवन देवमन सोनवणे (28, साईनगर, जळगाव) तरुणाने कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या तरुणाने आत्महत्या का केली? याबाबत ठोस कारण कळू शकले नसलेतरी कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

वर्षभरापूर्वीच वरणगावात नियुक्ती
जीवन सोनवणे या तरुणाची वर्षभरापूर्वीच वरणगाव पोलिसात नियुक्ती झाली होती. त्याचे वडील देवमन सोनवणे हे रेल्वे सुरक्षा बलात नोकरीला असल्याची माहिती मिळाली. अप रेल्वे लाईनवर त्याचा मृतदेह मिळून आला. नातेवाईकांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन बहिणी असा परीवार आहे.