वरणगाव- रुक्मिणी फाउंडेशन व नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यातर्फे शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गुरुरत्न पुरस्कार 2018 वितरण व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन तर प्रमुख वक्ते म्हणून जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातील प्रा.एल.पी.देशमुख उपस्थित राहणार आहेत. गुरुरत्न पुरस्कार वितरण व इयत्ता दहावी व बारावी यश मिळवलेल्या 150 गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, प्रा.जतीनकुमार मेढे, वरणगावचे उपनगराध्यक्ष अखलाक शेख अखलाक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन रुक्मिणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.