वरणगावात गुरे चोरणार्‍या टोळीचा प्रयत्न फसला

0

वरणगाव। येथील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांची चोरी करण्याचा प्रयत्न नागरीकांच्या सतर्कने फसल्याची घटना 9 रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तीघे आरोपींना वाहनासह वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय
महामार्गालगत असलेल्या वरणगाव उप कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात रात्री 1.30 वाजेच्या सुमारात शहरातील मोकाट गुरे वाहन क्रमांक एम.एच. 18 ए.ए. 3533 अशोक लेलॅण्ड कंपनीची पाढर्‍या रंगाची चारचाकी वाहनामध्ये गुरे चढवत असतांना प्रतिभा नगरमधील नागरीकांनी पाहिले असता आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्यांना दगड मारले यावेळी परिसरातील साजीद कुरेशी, शेख असिम आदींनी चोरांना पकडून मारहाण करुन वाहनाची तोडफोड केली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपी रोषण मधुकर सोनवणे (वय 29, राहणार आंबिका नगर धुळे), मुस्ताक शेख हमीद (वय 35, राहणार वळजई रोड हाजी नगर, धुळे), शेख रऊफ शेख उडण (वय 36, राहणार पोरगाव तालुका सिंलोड) या तिघांना अटक केली. वाहनचालक मनोज ऊर्फ मन्या फरार झाला आहे. शेख असिम शेख बशीर (रा. प्रतिभा नगर वरणगाव) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनिल वाणी, नागेश तायडे, मझर पठाण आदी तपास करीत आहे. सशयीत आरोपींना जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेवरुन वरणगाव शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे समजते. पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी यावेळी केली आहे.