वरणगावात तीन कोटीच्या विकासकामांना मंजुरी

0

वरणगाव- नगरपरीषदेची विशेष सभा बुधवार, 20 रोजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेविका माला मेढे, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेविका अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, जागृती बढे, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, अभियंता भैय्यासाहेब पाटील, दौलत गुट्टे, सभा लिपिक संजय माळी उपस्थित होते.

तीन कोटींच्या कामांना मंजुरी
विशेष सभेत प्रभाग 17 व 18 मध्ये सार्वजनिक शौचालय, प्रभाग तीन मध्ये 32 शीटचे, प्रभाग 7 व 8 मध्ये 40 शीटचे, प्रभाग क्रमांक एकमध्ये 40 शीटच्या शौचालयाला मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण कामाला मंजुरी देण्यात आली. एकूण तीन कोटी रुपयांच्या विकासकामांना सभागृहाने मंजुरी दिली. दरम्यान, हनुमान व्यायाम शाळेत आधुनिक व्यायामाचे साहित्य, इलेक्ट्रिक फिटिंग व हनुमान नगर वाचनालयात पुस्तके, फर्निचर, बुद्ध विहारात इलेक्ट्रिक फिटिंग तसेच गट क्रमांक 836, 655 मध्ये सामाजिक सभागृह, अल्पसंख्यांक सामाजिक सभागृहात इलेक्ट्रिक फिटिंग, प्रभाग 16 मध्ये अभ्यासिका बांधणे यासह शहरातील महत्व पूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरात सुरू असलेल्या कामाची माहिती सभागृहात दिली.