वरणगावात दिनदयाळ योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान

वरणगांव : प्रतिनिधी

वरणगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन दिनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबवले जाणार आहे .या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील महिलांना योजनेची उद्दिष्टे तसेच सविस्तर माहिती देण्यात आली .

 

हि योजना शहरातील महिलांचा सामाजिक आर्थिक तसेच उद्योगाच्या दृष्टीने महिलांच्या हिताची असुन सदर योजना वरणगाव नगरपरिषद मार्फत राबविण्यात येणार आहे.यात महिलांना बचत गट,वस्ती स्तर संघ,शहरस्तरीय संघ त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व महिला वैयक्तिक स्वयंरोजगार मिळवणार आहेत . तसेच गरिब महिलांच्या मुलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम अतंर्गत विविध प्रशिक्षण मिळणार असुन कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना यांचा देखील शहरातील बचत गटांना फायदा होणार आहे . इत्यादी कार्यक्रमाची माहिती कार्यक्रमात देण्यात आली . कार्यक्रमाला वरणगाव नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी पंकज सुर्यवंशी,आझाद पटेल, निशांत नागरे,अभय गुटाल, ज्ञानेश्वर पवार, राजुसिंग चव्हाण,दौलत गुट्टे, दिपक काळे व नगरपरिषद कर्मचारी तसेच रावेर नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी व फैजपूर नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे तसेच वरणगाव नगरपरिषदेचे अमोल भालेराव यांनी शहरातील महिलांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे व मा.नगरसेविका वैशाली देशमुख उपस्थित होते . हा कार्यक्रम मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .