भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या गळ्यातून आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शनिवारी लांबवल्याने गावात खळबळ उडाली आहे. मच्छिंद्रनगर भागातील सपना रमेश बोंडे या बोदवड रस्त्यावरून नागेश्वर मंदिराकडे पायी फिरण्यासाठी निघाल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाजवळ दुचाकीवर दोन जण त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी दीपनगरला जायचे आहे, ते कोणत्या दिशेला आहे, असे विचारत काही कळण्याच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढत दुचाकीने पळ काढला. दरम्यान, वरणगाव पोलिसात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.