वरणगावात नवाब मलिक यांचा जाहीर निषेध

0

मंत्री महाजन गटातील कार्यकर्ते जिल्हाध्यक्षांच्या पाठिशी ; खडसे गटातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष

वरणगाव : केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनहिताचे निर्णय घेवून चांगले काम करीत असून सरकारचे जनहिताचे निर्णय जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष उदयजी वाघ हे जळगाव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबवत असतांना मुंबईहुन आलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बिनबुडाचे निरर्थक आरोप केले. त्या आरोपाचा वरणगाव भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसूफ, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी साजिद कुरेशी, मेहनाजबी पिंजारी, माजी सरपंच सुखलाल धनगर, माजी सरपंच शेख सईद शेख भिकारी, माजी उपसरपंच साजिद कुरेशी, अलाउद्दीन शेठ अल्पसंख्यक अध्यक्ष, राजेंद्र गुरचळ, जेष्ठ कार्यकर्ते डॉ.बी.व्ही. जंगले, शामराव धनगर, प्रवीण ढवळे, ज्ञानेश्वर घाटोळे, प्रताप दिव्यविर, प्रकाश चौधरी यांनी निषेध केला. याप्रसंगी वरणगावचे पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ व महसूल विभागाचे सर्कल पवार यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, जलसंपदा मंत्री गटाच्या समर्थकांनी जिल्हाध्यक्षांची पाठराखण केली असलीतरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वरणगावसह भुसावळातील समर्थकांकडून अद्याप याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याने ही बाब राजकीय गोटात खळबळ उडवणारी ठरली आहे.

तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार
वरणगाव शहरातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीच्या व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तसेच बिनबुडाचे आरोप न थांबवल्यास सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील काही कमी जास्त झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा ईशारा देण्यात आला.
प्रसंगी डिके खाटीक, सोहेल कुरेशी, शोएब खाटीक, किशोर सोनार, कमलाकर मराठे, हितेश चौधरी, महेश माळी, कुंदन माळी, तेजस जैन, चेतन माळी, सचिन मेथालकार, अतुल पाखरे, मयूर मराठे, जीवन भंगाळे, विवेक कुलकर्णी, दीपक गायकवाड, आकाश मेढे, मयूर मराठे, आकाश माळी, प्रमोद पाटील, संजय सोनार, संजय बेडरकर, आकाश मराठे , शोएब शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या वेळी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो उदयजी वाघ तुम आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या.