वरणगावात प्रभाग 17 मध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

0

विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज -सुनील बढे

वरणगाव- शहरातील प्रभाग क्रंमाक 17 मधील नगरसेविका माला मिलिंद मेढे यांच्या वॉर्डात 24 लाख रुपये किमतीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन जळगावचे प्रदेशसध्यक्ष सुनील बढे यांच्याहस्ते करण्यात आले. विकासकामे करीत असतांना सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे बढे म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, संजीव कोलते, ईरफान पिंजारी, साजीद कुरेशी, कलीम शेख, नगरसेविका माला मेढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अशोक मोरे, भिका मोरे, देवदास निकम, रत्न मोरे, देविदास मोरे, बक्षी मोरे, भास्कर निकम, वामन अवचारे, शांताराम गुरचळ, रवींद्र महाले, मधुकर इंगळे, महेंद्र तायडे, विक्की मेढे, रुपेश मेढे, संजय इंगळे, चेतन सोनवणे, महेश महाले, सचिन मोरे, योगेश कोळी, भोला इंगळे, सोनू भालेराव, विजय सुरवाडे, वैशाली चौधरी, अलकेश मेढे, शुभम मेढे, सुनंदाबाई मोरे आदींसह प्रभागातील नागरीक उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद मेढे यांनी केले.