वरणगावात रंगली महिला मल्लांची कुस्त्यांची दंगल

0

जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ व भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने कुस्त्यांच्या आमदंगलीचे आयोजन ; विजयी मल्लांचा मान्यवरांकडून पारीतोषिक देवून सन्मान

भुसावळ- जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ व भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वरणगाव शहरात स्वर्गवासी झालेल्या नागरीकांच्या स्मरणाि कुस्त्यांच्या भव्य आम दंगलीचे आयोजन करण्यात आले. महिला मल्लांनी पुरूष मल्लांसोबत कुस्ती खेळत उपस्थितांचे लक्ष वेधले तर महिला-पुरूष मल्लांमध्ये रंगलेला कुस्तीचा डाव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रसंगी विजयी मल्लांना बक्षीस देवून सन्मानीत करण्यात आले. प्रथमच वरणगाव शहराच्या कुस्ती आमदंगलीत महिलावर्गाने सहभाग घेतल्याने शहर व परीसरातील महिलांमध्ये जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी चंद्रकांत बढे, नगराध्यक्ष सुनील काळे, सुधाकर जावळे, प्रदीप भोळे, राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, शकील शेख, मिलिंद मेढे, कादर शेख, बळीराम माळी, गोगा शेठ, तात्यासाहेब देशमुख, निलेश झोपे आदी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मूर्तीची पूजा करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कुस्ती स्पर्धेमध्ये खंडवा, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश, जळगाव, एरंडोल, नशिराबाद, रावेर, चाळीसगाव, बुलढाणा अशा विविध शहरातून मल्ल सहभागी झाले होते.

यांनी पाहिले पंच म्हणून काम
पंच म्हणून पहेलवान नामदेव मोरे, सुपडू सोनवणे, दिलीप मराठे, प्रशांत निकम, एकनाथ भोई, ईस्माईल शेख, उत्तम भोई, संजय बावस्कर, भैय्या सोनवणे, इफ्तेखार मिर्जा, इकबाल पहेलवान यांनी काम पाहिले. आयोजन कमेटीचे संजय बावस्कर, महेश सोनवणे, पवन माळी, श्रीराम भोई, गणेश कोळी, श्रीराम भोई, मनोज भोई, शिवा भोई, गणेश धनगर, अजय भोई, संदीप भोई, राजेश गुमडकर आदी हनुमान शाळेतील मल्लांनी परीश्रम घेतले.